News Flash

पाकिस्तानची भीती वाटते -वॉटसन

पाकिस्तानचा संघ ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहता त्यांची नक्कीच भीती वाटते. कारण पाकिस्तान फॉर्मात असल्यावर कधीही सामना फिरवण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू

| March 18, 2015 12:03 pm

पाकिस्तानचा संघ ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहता त्यांची नक्कीच भीती वाटते. कारण पाकिस्तान फॉर्मात असल्यावर कधीही सामना फिरवण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने व्यक्त केले.
‘‘पाकिस्तानचा संघ फॉर्मात आला असून ते अद्भुत कामगिरी करू शकतात. त्यांच्याविरुद्ध बरेच सामने खेळलो असलो, तरी त्यांची गेल्या काही सामन्यांमधील कामगिरी नेत्रदीपक आहे. त्यामुळे हा सामना आम्हाला सोपा नसेल. पण आम्ही सर्वोत्तम कामगिरी करून या सामन्यात विजय मिळवू. हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा सामना आहे, त्यामुळे काहीही करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू,’’ असे वॉटसन म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:03 pm

Web Title: australia fear pakistan on a roll
Next Stories
1 सट्टे पे सट्टा : विश्वविजेता कोण?.. ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड?
2 पोपटपंची : खारीचा वाटा!
3 कोहलीकडून अनुष्काच्या ‘एनएच१०’चे कौतुक
Just Now!
X