ऑस्ट्रेलियाचा संघ यंदा विश्वविजेता होण्याची शक्यता दिसत आहे. निवृत्तीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, मात्र ५० षटकांच्या क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ जवळ येत चालली आहे, असे संकेत ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनने दिले आहेत.
‘‘मी अजून निवृत्तीबाबत विचार केलेला नाही. परंतु बरेच एकदिवसीय सामने माझ्या खात्यावर जमा आहेत. मी विश्वचषक अभियानाचा आनंद लुटत आहे. अजून महिन्याभराने मेलबर्नला होणाऱ्या अंतिम फेरीच्या सामन्याची मी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.’’