दररोज थकवणारा सराव करण्यापेक्षा तीन दिवसांचा थोडा, पण अर्थपूर्ण सराव महत्त्वाचा आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. भारतीय संघाच्या अनियमित सराव सत्रांमुळे ऑस्ट्रेलियातील अनेक जण चकित झाले आहेत. भारतीय संघाने चारपैकी दोनच दिवस सराव केला.
‘‘आम्ही आमच्या सरावाचे विभाजन केले आहे. तीन दिवसांचा अथक सराव, सहा दिवसांच्या रूक्ष सरावापेक्षा चांगला ठरतो,’’ असे धोनीने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘‘सात आठवडय़ांमध्ये पसरलेल्या विश्वचषकात खेळाडू मानसिकदृष्टय़ा ताजेतवाने राहण्याची आवश्यकता आहे. जेव्हा सातत्याने क्रिकेट खेळले जाते त्या वेळी सराव सत्रांपेक्षा विश्रांती महत्त्वाची ठरते. सराव आणि विश्रांती यांचा योग्य मेळ घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’