पाकिस्तानने आर्यलंडविरुद्धचा सामना जिंकून दुसऱ्या गटातील आपले तिसरे स्थान पक्के केल्यामुळे त्यांना आता उपांत्यपूर्व फेरीत कडव्या ऑस्ट्रेलियाशी झुंजावे लागणार आहे. अर्थात सट्टेबाजाराचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहे. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की, त्यात कधी काय चमत्कार होईल सांगता येत logo07नाही. त्यामुळेच कदाचित ऑस्ट्रेलियाला ५५ पैसे भाव देऊ करणाऱ्या सट्टेबाजांनी पाकिस्तानला दोन रुपये भाव दिला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याबाबत सट्टेबाजांमध्ये अजिबात साशंकता नाही. त्यामुळे बांगलादेशने चमत्कार केलाच, तर एका रुपयाला पाच रुपये असा भाव देऊ केला आहे. मात्र पूर्वेतिहास पाहता बांगलादेश चमत्कार करू शकेल, असे सट्टेबाजांना वाटत आहे. उर्वरित दोन उपांत्यपूर्व सामन्यांपैकी न्यूझीलंड-वेस्ट इंडिज यांच्यात न्यूझीलंडसाठी डोळे बंद करून सट्टेबाजांनी कौल दिला आहे. मात्र या सामन्याबाबतही पंटर्स आशावादी आहेत. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याबाबत सट्टेबाज सावध खेळी करीत आहेत. दक्षिण आफ्रिकेलाच पसंती दिली असली तरी श्रीलंकेबाबतही ते आशावादी आहेत. त्यामुळेच श्रीलंकेला त्यांनी ९० पैसे असा भाव देताना दक्षिण आफ्रिकेला ६५ पैसे म्हणजे सामन्यात काहीही होऊ शकते, असा अंदाज वर्तविला आहे. एकूणच उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतींची सट्टेबाजाराला आशा आहे.

उपांत्यपूर्व सामन्यांचे भाव
भारत : २० पैसे    बांगलादेश : पाच रुपये
ऑस्ट्रेलिया : ५५ पैसे    पाकिस्तान : दोन रुपये
न्यूझीलंड : ३५ पैसे    वेस्ट इंडिज : सव्वा दोन रुपये
द.आफ्रिका : ६५ पैसे    श्रीलंका : ९० पैसे