भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्टेलियाला हरवणे क्रमप्राप्त आहे. सट्टेबाजांनी भारताऐवजी
सध्या तरी ऑस्टेलियाला पसंती दिली आहे. मात्र भारतच ऑस्टेलियाला टक्कर देऊ शकते, याची कल्पना logo07असलेल्या सट्टेबाजांनी दोन्ही संघांना भाव देताना चांगलीच सावधगिरी बाळगली आहे. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे सट्टेबाजारातही जोरदार उलाढाल झाली आहे. प्रत्यक्ष सामना सुरू होईपर्यंत त्यात कमालीचा चढउतार होईल, अशी सट्टेबाजांना आशा आहे. भारतासाठी सध्या सट्टेबाजांनी एक रुपया असा तर ऑस्टेलियासाठी ६५ पसे भाव देऊ केला आहे. याचा अर्थ सट्टेबाजारातही नेमके कोण विजयी होईल, याची शाश्वती नाही. विश्वविजेतेपदासाठी आजही ऑस्टेलिया आणि त्यापाठोपाठ न्यूझीलंडला पसंती कायम आहे. भारताला मात्र तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेला सध्या  सट्टेबाजारात महत्त्व नाही. मात्र सट्टेबाजारात प्रत्येक दिवशी भाव बदलत असतात.
सामन्याचा भाव
ऑस्टेलिया : ६५ पसे  भारत : एक रुपया
निषाद अंधेरीवाला