विश्वविजेता कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर अंतिम फेरीच्या पूर्वसंध्येला सट्टेबाजांकडे तयार आहे. त्यांच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाच विश्वचषक पटकावेल, असा ठाम अंदाज आहे. त्यासाठी सट्टेबाजांनी ३५ पैसे देऊ केले logo07आहेत. न्यूझीलंड विश्वविजेता ठरला तर दीड रुपया असा भाव देऊ केला आहे.  उत्कृष्ट फलंदाज म्हणून मार्टिन गप्टिल तर गोलंदाज म्हणून ट्रेंट बोल्टची चर्चा आहे. यासाठी अनुक्रमे ३५ पैसे आणि ४५ पैसे भाव देऊ करण्यात आला आहे. भारतीय संघ अंतिम फेरीत न पोहोचल्याने निराश झालेल्या सट्टेबाजांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यासाठीही मोठय़ा प्रमाणात सट्टा लावल्याची चर्चा आहे. भारत अंतिम फेरीत असता तर होणारी आर्थिक उलाढाल अधिक असती, असेही भारतीय सट्टेबाजांचे म्हणणे आहे.
सामन्याचा भाव
    ऑस्ट्रेलिया :     न्यूझीलंड :
    ३५ पैसे (४/९)    दीड रुपया (१९/१०)
(कंसात आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारातील भाव)