28 February 2021

News Flash

न्यूझीलंडला महत्त्व

इंग्लंडला नमवल्यामुळे न्यूझीलंडला सट्टेबाजारात चांगले महत्त्व आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा भाव वधारला आहे.

| February 21, 2015 05:52 am

इंग्लंडला नमवल्यामुळे न्यूझीलंडला सट्टेबाजारात चांगले महत्त्व आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा भाव वधारला आहे. या सामन्यात इंग्लंडचा विजय झाला असता तर सट्टेबाजांना फटका बसला असता. सट्टाबाजारातील समीकरणेही थोडीफार बदलली असती. पहिल्या पाचातील इंग्लंडच्या स्थानाला धक्का wc11बसला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर भारताचे भवितव्य बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. संभाव्य विश्वविजेत्यामध्ये सट्टेबाजांनी न्यूझीलंडला दिलेला तिसरा क्रमांक अद्याप कायम ठेवला आहे. मात्र त्यात थोडा फरक पडला आहे. भारताला आता न्यूझीलंडइतकाच भाव सट्टेबाजांनी देऊ केला आहे. भारताला आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारानेही पाचवा क्रमांक देऊ केला आहे. ऑस्टेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांना उद्याच्या लढतीत अजिबात आव्हान नसल्याचे सट्टेबाजांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या संघांना भाव देताना सट्टेबाजांनी हात आखडता घेतलेला नाही. मात्र या सामन्यांमध्ये अनपेक्षित निकाल आला तर सट्टेबाजांना फटका बसणार आहे.
सामन्याचा भाव
ल्ल ऑस्ट्रेलिया : १५ पसे;  बांगलादेश : ५ रुपये
ल्ल श्रीलंका : ४५ पसे; अफगाणिस्तान : ३.३० रुपये
निषाद अंधेरीवाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 5:52 am

Web Title: betting on new zealand
टॅग : New Zealand
Next Stories
1 विराटची ‘फेसबुक’वरही भरारी
2 ओरखडा मिटता मिटेना..
3 इंग्लिश शोकांतिका!
Just Now!
X