दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्स आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल सध्या भलत्याच फॉर्मात आहेत. ते फटकेबाजी करायला लागले की गोलंदाज आणि कर्णधार यांचे डावपेच निकामी होतात़  त्यामुळे या दोघांनी धास्तीमुळे भल्याभल्यांची झोप उडवली आहे. हीच चिंता प्रकट केली आहे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने.  ‘‘डी’व्हिलियर्स आणि गेल बेफाम फटकेबाजी करीत असताना गोलंदाज किंवा कर्णधार काहीच करू शकत नाही,’’ असे वक्तव्य धोनीने केले आह़े  
शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीसाठी धोनी कसून सराव करीत आह़े  गेल आणि डी’व्हिलियर्स हे दोन असे खेळाडू आहेत, ज्यांची धोनीला दखल घेणे भाग पाडल़े  डी’व्हिलियर्सला बाद करण्यासाठी आखलेली युक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो धावबाद झाला़  त्यामुळे धोनी निर्धास्त दिसला़, पंरतु शुक्रवारी त्याला जमैकन वादळाला रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आह़े  झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करणाऱ्या गेलला याच पुनरावृत्तीपासून रोखण्याचे लक्ष्य धोनीसमोर आह़े  
बिनधास्त आणि बेधडक फलंदाजांना रोखण्यासाठी खास रणनीती आखली आहे का, हा प्रश्न ‘कॅप्टन कुल’ धोनीला विचारला असता तो स्मितहास्य करीत म्हणाला, ‘‘गेल, ए बी किंवा ब्रेंडन मॅक्क्युलम हे आपल्या सुरात असताना त्यांच्याविरुद्ध कोणतीही योजना न आखणे, हीच सर्वोत्तम योजना आह़े  एखादा फलंदाज षटकारांची आतषबाजी करीत असेल, तर त्याच्यासाठी कुठेही क्षेत्ररक्षण लावा त्याचा फारसा उपयोग होणार नाही़  आखूड चेंडू टाकूनही फार उपयोग होणार नाही़  ते फलंदाज तो चेंडूही प्रेक्षकांमध्ये सहज भिरकावून लावतील़  त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही़ ’’
‘‘या फलंदाजांना गोलंदाजीत प्रयोग करून चकवणे, हाच एक उपाय आह़े  गेल किंवा ए बी यांच्यासमोर गोलंदाजी करताना गोलंदाजांना विविध प्रयोग करण्याची मुभा देणे, यावर माझा विश्वास आह़े  गेल व ए बी मैदानावर बेफाम फलंदाजी करीत असताना त्यांना रोखण्याची मिळालेली निम्मी संधीही हेरायला हवी़  यासाठी गोलंदाजांनी पुढाकार घ्यायला हवा आणि त्यांना इतर खेळाडूंकडून योग्य साथ लाभल्यास या फलंदाजांवर दबाव बनविणे सहज शक्य होते,’’ असे धोनी म्हणाला.
भारतासाठी गेल हा महत्त्वाचा विषय नाही, परंतु वेस्ट इंडिज संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून या लढतीत दमदार खेळाची अपेक्षा आह़े  गेले दोन दिवस गेलने सरावही केलेला नाही़  याबाबत डॅरेन सॅमीला विचारले असता तो म्हणाला, ‘‘ माझ्या माहितीनुसार संघातील प्रत्येक खेळाडू तंदुरुस्त आह़े  गेलच्या पाठीचे दुखणे बरे आह़े  तो सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे आणि वेस्ट इंडिजला विजय मिळवून देत आह़े  तंदुरुस्त असल्यावर तो शंभर टक्के योगदान देतो़