विश्वचषक विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांतील सामन्याबाबत २९ मार्चच्या अंतिम सामन्याची रंगीत तालीम असे काल-परवापर्यंत सट्टाबाजारात बोलले जात होते. भारताने wc11पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार विजय मिळविल्यानंतर मात्र सट्टेबाजारात चुळबुळ सुरू झाली आहे. अंतिम सामन्यातील एक प्रबळ दावेदार म्हणून आता भारताकडे पाहिले जात आहे. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारात भारताचा क्रमांक चौथा असला तरी भारतीय सट्टेबाज अंतिम सामन्यात भारत खेळेल, असे भविष्य वर्तवू लागले आहेत. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला त्यामुळेच महत्त्व आले आहे. अर्थात या सामन्यात ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड आहे. सट्टेबाजांनी न्यूझीलंडला कडवी लढत द्यावी लागेल आणि हा सामना ते जिंकले तर त्यांना सव्वा रुपया भाव देऊ केला आहे. या सामन्यात अनपेक्षित निकाल लागला तर सट्टेबाजांना तो हवाच आहे. पंटर्स मात्र ऑस्ट्रेलियाबाबतच आशावादी आहेत. भारताकडून मोठा पराभव पत्कराव्या लागलेल्या दक्षिण आफ्रिकेला वेस्ट इंडिजविरुद्ध मोठय़ा विजयाची अपेक्षा आहे. निदान सट्टेबाजांनी तरी तसाच भाव देऊ केला आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल कमालीचा फॉर्मात असल्यामुळे त्याच्या शतकासाठीही सट्टेबाजांनी भाव देऊ केला आहे. उर्वरित सट्टाबाजाराचे लक्ष ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्याकडेच आहे.
सामन्यांचा भाव
*दक्षिण आफ्रिका     वेस्ट इंडिज
    ३५ पैसे     दोन रुपये
*ऑस्ट्रेलिया    न्यूझीलंड
    ६५ पैसे    सव्वा रुपया