popat(पांढरा टी-शर्ट आणि त्यावर रंगांचे फटकारे आणि चेहरा त्याहून विविध रंगांनी रंगलेला एक माणूस तोतारामकडे येतो.)
तोताराम : नमस्कार. मी तुमच्यासाठी काय करू शकतो?
चंपक : अहो मी.
तोताराम : मी कोण?
चंपक : अहो, रंग लागलाय फक्त. विसरलात?
तोताराम : चंपकराव!
चंपक : वेस्ट इंडिजचं वळण घातक ठरणार होतं. माही होता म्हणून. आज खूप काम आहे विठ्ठलपंतांना.
(विठ्ठलपंत हिरवं कार्ड हाती देतात)
तोताराम : दक्षिण आफ्रिका जिंकेल. ४०० दोनदा केल्यात, पण अजूनही ते धडपडतात. पेपरमधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत असूनही काही स्कॉलर लोक गोंधळलेले असतात. सगळ्या तोफा सज्ज आहेत युद्धाला, पण नक्की कोणती उपयोगात आणावी हेच विसरायला व्हावं तसं होतं यांचं. आफ्रिका त्यांच्यापैकीच एक. हशिम आणि ए बी कामाची माणसं. स्टेनला सूर गवसण्यासाठी अचूक स्थिती. आर्यलड- झिम्बाब्वे नेहमीच धमाल मॅच होते. आर्यलड जिंकेल पण वेस्ट इंडिजविरुद्ध जसे खेळले तरच. जॉर्ज डॉकरेल आणि केव्हिन ओ’ब्रायन यांच्यावर बरंच काही अवलंबून आहे. न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दैना उडाली होती. आता त्यांनी अफगाणिस्तानची दैना उडवावी.
चंपक : दमलो ऐकून. रंग खेळून दमलोय. टीम इंडियानं बेरंग टाळला हे नशीबच म्हणायचं. कल्टी मारतो.