sattaविश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने वेस्ट इंडिजची स्थिती बिकट केल्यानंतर खूपच वधारलेला भाव नंतर सावरला. शंभर धावांमध्ये वेस्ट इंडिजचा डाव आटोपेल असे वाटत असतानाच १८२ धावांपर्यंत त्यांची मजल गेली. अशा घटनांचाही सट्टेबाजारात परिणाम होत असतो. सुरुवातीला भारताचा एकही फलंदाज पहिल्या पाचांत नव्हता. त्यानंतर पहिल्या पाच फलंदाजांमध्ये विराट कोहलीचे नाव होते. परंतु आता ती जागा शिखर धवनने घेतली आहे. विराटचा सहावा क्रमांक आहे. एकही गोलंदाज अद्याप सट्टेबाजारात पहिल्या पाचांत स्थान मिळवू शकलेले नाही. भारताचा आजही चौथा क्रमांक कायम आहे. आपल्या गटात भारतच अव्वल राहील यासाठीही भाव देऊ करण्यात आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेला पसंती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तानबरोबर होणार आहे. अर्थातच सट्टेबाजांनी दक्षिण आफ्रिकेलाच हिरवा कंदील दाखविला आहे. झिम्बाब्वे-आर्यलड यांच्यात सट्टेबाजांनी चुरस होईल असा अंदाज देत भावात फारसा फरक दिलेला नाही. अफगाणिस्तानबरोबरच्या सामन्यात न्यूझीलंडला भाव दिलेला नाही. म्हणजे अफगाणिस्तानने चमत्कार केला तरच पंटर्सची मजा आहे.
सामन्यांचे भाव
दक्षिण आफ्रिका : २० पैसे; पाकिस्तान : साडेतीन रु.
झिम्बाब्वे : ९० पैसे; आर्यलंड : एक रुपया
न्यूझीलंड : भाव नाही. अफगाणिस्तान : आठ रुपये
निषाद अंधेरीवाला