पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या केप टाऊनच्या पर्वतराजींवर असलेल्या डेल स्टेनच्या घराला विध्वंसक आगीच्या वेढय़ातून वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे त्याने आभार मानले आहेत.
आपत्कालीन यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, या वणव्यात अनेक घरे भस्मसात असून एक जवान जखमी झाला आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, जवळपास तीन हजार हेक्टर जमीन या वणव्यात खाक झाली आह़े  हेलिकॉप्टरमधून पाण्याचा वर्षांव करून आग विझवण्यात जवानांना यश आल़े  
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत खेळणाऱ्या स्टेनला या आगीतून त्याचे घर सुखरूप वाचवण्यात आले असल्याचे कळवण्यात आले आहे. याबाबत स्टेन म्हणाला, ‘‘मी कॅनबेरा येथे होतो आणि त्या रात्री मोबाइल सायलेंटवर ठेवला होता़  मला जवळपास ८० मॅसेजेस आणि ३० मिस कॉल आले होत़े  हे पाहिल्यावर लगेच उत्तर दिले आणि तेव्हा कळले की ती आगीचा वणवा पसरत घराच्या नजीकपर्यंत पोहोचला होतो़  केप टाऊनमध्ये पहाटे ३:३०च्या सुमारास ती आग लागली होती़  त्या वेळी कॅनबेरा येथे किती वाजले होते याची मला कल्पना नाही, परंतु ते लोक पाच मिनिटांत घरातून काय महत्त्वाचे बाहेर काढता येईल का, हे फोनवर विचारत होत़े ’’
‘‘आयुष्यात यापूर्वी इतका कधीच घाबरलो नव्हतो, जितका त्या एका फोनने धास्तावलो. घरापाूसन मी जवळपास अध्रे जग दूर होतो आणि आयुष्यात आतापर्यंत जे काही कमवले ते या घरात होत़े  यष्टी, चेंडू अशा सुमारे ३१ वर्षांच्या आठवणी त्या घरात होत्या़  त्यामुळे अग्निशमन दलाच्या त्या अधिकाऱ्याला काय वाचवू शकतो हे सांगणे कठीणच होत़े  त्यांच्याकडे केवळ पाच मिनिटेच होती़  मला स्वत:चा राग येत होता, ’’ असे स्टेनने सांगितल़े  
या आगीचा फटका जॅक कॅलिस याच्या घरालाही बसल्याचे स्टेनने सांगितल़े