(लॅपटॉप, डोंगल, पेन ड्राइव्ह असं सगळं सोबत घेऊन चंपक अवतरतो.)
चंपक : आज ‘वर्क फ्रॉम होम’ आहे आणि लॅपीचा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे झिम्बाब्वेसाठी wc13शॉन विल्यम्सने काम फत्ते केलं. इंग्लंड-न्यूझीलंडचं बोला?
(विठ्ठलपंत काळ्या रंगाचं कार्ड काढतात)
तोताराम : विजय न्यूझीलंडचा आहे. बेसिन रिझव्‍‌र्हचं मैदान त्यांना आवडतं. जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड आणि स्टुअर्ट फिन या त्रिकुटाला सन्मान देत खेळायला हवं. न्यूझीलंडकडे सगळे धुपाटणंसदृश बॅट्समन आहेत. पण जर काही गडबड झाली तर सबुरीनं घेणारा केन विल्यमसन महत्त्वाचा आहे. ट्रेंट बोल्ट सुसाट आहे. व्हेटोरीचा अनुभव कामी येईल.
चंपक : इंग्लंडला काहीच चान्स नाही?
तोताराम : ते कोशातून बाहेर आले तर ना? मध्ययुगीन काळातलं क्रिकेट खेळतात. शैलीदार अशी बॅटिंग करतो बेल. पण फक्त पाहून होत नाही. जोश बटलरला वर ढकला बॅटिंगमध्ये. मॉर्गनला सूर गवसला ना तर मग ग्राऊंड लहान वाटायला लागेल एकदम. जो रूटने खेळपट्टीचं मूळ शोधून नांगर टाकायला हवा. मोइन अली ट्रम्पकार्ड होऊ शकतो. या पार्ट टायमरला चोपू, या माजात बरेच भलेभले फसले आहेत. मॅच पाहायला धमाल येईल.
चंपक : तेच तर हवंय!