पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेला वेस्ट इंडिजचा माजी तडाखेबंद सलामीवीर ख्रिस गेल याला संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते; पण न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत गेल खेळेल, अशी आशा वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केली आहे.
‘‘गेल सध्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे, पण तो आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे, मला खात्री आहे की, तो जरी पूर्णपणे तंदुरुस्त नसला तरी या सामन्यात नक्की खेळेल,’’ असे होल्डरने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 3:01 am