20 September 2020

News Flash

हशिम अमलाने मोडला विराट कोहलीचा विक्रम

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम अमलाने मंगळवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला आहे.

| March 3, 2015 01:52 am

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हशिम अमलाने मंगळवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला आहे.
आयर्लंडविरुद्ध केलेल्या शतकानंतर अमला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० शतके ठोकणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. अमलाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०८ व्या डावात आपले २० वे शतक गाठले. तर, कोहलीला २० शतके पूर्ण करण्यासाठी १३३ डाव खेळावे लागले होते. अमलाने आजच्या सामन्यात १२८ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारासह १५९ धावांची धुवांधार खेळी साकारली. अमलाने आतापर्यंत खेळलेल्या १११ एकदिवसीय सामन्यांत ५६.७२ च्या सरासरीने ५६१६ धावा कुटल्या आहेत. अमलाने आयर्लंडविरुद्ध साकारलेली १५९ धावांची खेळी त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आहे. त्याने फॅफ डू प्लेसिससह २४७ धावांची भागीदारी रचली आणि संघाला ४०० आकडा गाठण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 1:52 am

Web Title: hashim amla flattens virat kohlis record becomes fastest to 20 odi tons
टॅग Hashim Amla
Next Stories
1 क्रिकेटसंघ हे ‘मोबाईल अॅप्स’ असते तर…
2 BLOG : डी विलीयर्सला रोखता येऊ शकते
3 बेधुंद संगकाराच्या लाहिरी!
Just Now!
X