wclogo77‘है दिल दिलदारा मेरा तेली का तेल, कौडी कौडी पसा पसा पसे का खेल. चल चल सडम्कों पे होगी.. ढॅण टॅण.. ढॅण्टॅण्ॉण..’ अशी पाटी लावून भारतीय संघाचा डम्पर प्रतिस्पध्र्याना चिरडत निघाला आहे. विश्वचषकापूर्वी सातत्याने हरलेल्या धोनी ब्रिगेडला रवी शास्त्रीने ‘फिक्र मत कर बंदे, ये दिन भी गुजम्र जायेंगे.. हसी हसनेवालों के चेहेरे उतर जायेंगे’ अशी पाटी दाखवली असावी. विराट तर सुसाट सुटला आहे. ‘देवा! सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर,’ ही त्याची स्वार्थी पाटी पाहून भुवया उंचावल्या जातात. ‘वरण भात लोणचा, कोणी नाही कोणचा’ पाटी लावल्यासारखा त्याचा वावर ‘अत्यंत ज्वालाग्राही’ असतो. ‘प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणूनच मी शांत आहे,’ कॅप्टन कुल धोनीची यापेक्षा दुसरी पाटी असूच शकत नाही.
‘माझ्याशी पज लावू नका, लय भारी पडेल,’ असं लिहून खाली बारीक अक्षरात ‘चालक शिकत आहे’ अशी पाटी लावलेल्या िलबूटिंबू आर्यलडनं झिम्बाब्वेला रस्ताउतार केले तर ‘सीख ले बेटा ड्रायव्हरी, फुटे तेरे करम, खाना मिले कभी कभी, फिर आना अगले जनम,’ अशी पाटी लावत बांगलादेशने साऱ्या जगाला क्रिकेट शिकवलेल्या इंग्लडची गाडी पलटी केली. ‘देवाक् काळजी’ ही पाटी असलेल्या नवख्या संयुक्त  अरब अमिरातीही हा विश्वचषक खेळला, फक्त ही एवढीच नोंद होईल.
आर्यलडच्या जॉन मुनीनं झिम्बाब्वेला ‘नजम्र हटी, दुर्घटना घटी’ पाटीचं महत्त्व समजावलं. संगकारानं तर साखळी फेरीतच ‘हा रस्ता माझ्या बापाचा आहे’, ‘हिम्मत है तो ओव्हरटेक कर, वरना बरदाश्त कर’, ‘चमचे की है तीन दवाई.. जुता, चप्पल और पिटाई’, ‘वाघ तो वाघच’ अशा पाटय़ांवर पाटय़ा बदलल्या.
भारतामुळे उपांत्यपूर्व फेरीचा घाट चढण्याच्या पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या. भर पावसात दक्षिण आफ्रिकेची गाडी पाकिस्तानच्या ‘वडिलांचा आशीर्वाद’ ही पाटी लावून चाललेल्या टेम्पोला बाचकली आणि डकवर्थ-लुइसच्या स्पीडब्रेकरवर आदळली. ‘आली लहर म्हणून केला कहर’ची पाटी लावून आर्यलडनं भल्याभल्यांना चकवलं आणि ‘सावन को आने दो’ पाटी ठेवून ते वेस्ट इंडिजला सामोरे गेले. यामुळे उत्साहित झालेल्या ख्रिस गेलनं त्यांना ‘आया सावन झुमके’ची पाटी लावून धू धू धुतलं. ‘मत ले पंगा पटक दूंगा’, ‘सुसाइड मशीन’, ‘बच्चे शेरका पिछा नहीं करते’, ‘चिटके तो फटके’ अशा धमकीवजा पाटय़ा लावून फिरणाऱ्या गेलचा ट्रक साइडला करताना नबाबी शमीच्या वेगवान गाडीनं ‘तू भारी, तर जा घरी’ पाटी वापरली. पाकिस्तान जरी ‘हॉर्न ओके प्लीज’ पाटी लावून फिरला तरी ‘मौका’ मिळताच ‘उगीच हॉर्न वाजवू नये’ अशी पाटी भारताला दाखवल्याशिवाय रहाणार नाही. म्हणूनच पाकिस्तानच्या ट्रकसमोर भारताचा सावध डम्पर ‘देनेवाला तो महान है, पर जलनेवालों से परेशान हैं’ ही पाटी लावूनच जातो. धावगतीचा भुकेला ए बी डी’व्हिलियर्सचा ट्रक ‘सावध, माझ्या मागे वाघ लागला आहे’, ‘बघतोस काय? मुजरा कर!’ अशा पाटय़ा लावून फिरतो.
‘अगर ड्रायवरने नशा कर डाला, तो समझो फोटो पे चढम् गयी माला’ अशी सावध पाटी लावत पाकिस्तानच्या तेजतर्रार गाडय़ांमध्ये विश्वचषकाच्या प्रवासात बऱ्याच वर्षांनंतर सर्फराजच्या स्कूटरनं धावांची शंभरी गाठण्यात यश मिळवलं. पण उपांत्यपूर्व घाटात त्यांची गाठ ऑस्ट्रेलियाच्या ‘तुट फुट की कोई जिम्मेदारी नहीं’ ही पाटी लावलेल्या रोडरोलरशी आहे. पाकिस्तानची तेव्हा पाटी असेल ‘जजमेंट फेल तो येरवडा जेल’.
‘चक दे फट्टे, नप दे गिल्ली, सुबह जालंधर, शाम में दिल्ली’ पाटी लावल्याच्या तालात भारताचा डम्पर विश्वचषकामध्ये ‘बल्ले बल्ले’ करण्यास सज्ज आहे. मात्र भारताला ‘डोंट टच मी. आय अ‍ॅम नॉट दॅट टाइप ऑफ कार’ची पाटी टांगून आश्चर्याचा धक्का देण्यासाठी बांगलादेशची कार आसुसलेली आहे.
‘बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं’ पाटी लावलेल्या संगकाराची श्रीलंका आणि ‘कितने भी खरीद ले हिरे मोती, लेकिन कफन को जेब नहीं होती’ पाटी लावत श्रीलंकेला रस्ता सोडायला लावण्याचा प्रयत्न करू पाहणारी डी’व्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका तर ‘लटक मत, टपक जाएगा’ अशी पाटी असलेल्या गेलच्या वेस्ट इंडिजला न्यूझीलंड ‘अच्छा, टाटा, फिर मिलेंगे..’ची पाटी दाखवेल का? अमिराती, बांगलादेश, आर्यलड, झिम्बाब्वे, इंग्लंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंडच्या गाडय़ा अपघातग्रस्त होऊन गॅरेजमध्ये गेल्या आहेत. आता उपांत्यपूर्व फेरीचा ‘अपघात प्रवण’ घाट सुरू होतोय. ‘ये रास्ते पहाडम् के, चढम्ना संभल संभल के, हड्डी भी नजम्र न आएगी गिर जाओगे जो फिसल के’ हे गीत प्रत्येक संघाचा पाठीराखा म्हणत असेल.
‘नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा’ पाटी लावून शिखर, ‘नाद खुळा’ पाटी विराटची. ‘सरळ रेषेत चला, रस्ता होईल आपोआप खुला’ अजिंक्य रहाणेची पाटी तर, ‘भोपू बजाव, गाडम्ी भगाव’ सुरेश रैना, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ पाटी लावून धोनी, ‘करशील नाद, तर होशील बाद’ ही पाटी शमीची, ‘मेरी चली तो तेरी क्यूं जली’ पाटी उमेशकडे, ‘अं हं. घाई करायची नाही तुमच्या हॉर्ननं सिग्नल बदलत नाही’ असा इशारा देत अश्विन, ‘हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात’ इशाऱ्याची पाटी मोहित शर्माची. अशा भन्नाट पाटय़ा लावलेला भारताचा डम्पर सर्वावर भारी पडावा, ही मनोकामना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे.