भारत व बांगलादेश यांच्यात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीसाठी इंग्लंडचे इयान गोल्ड व पाकिस्तानचे अलीम दार हे पंच म्हणून काम करणार आहेत. हा सामना मेलबर्न येथे १९ मार्च रोजी होणार आहे.
या सामन्यासाठी स्टीव्ह डेव्हिस हे तिसरे पंच, तर पॉल रायफेल हे चौथे पंच असतील. श्रीलंकेचे रोशन महानामा यांच्याकडे सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
अन्य लढतींकरिता पंच –
१८ मार्च- सिडनी येथे श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका- रॉड टकर व निगेल लाँग (मैदानावरील पंच), रिचर्ड केटलबोरो (तिसरे पंच).
२० मार्च- अ‍ॅडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- मराईस एरामुस व कुमार धर्मसेना (मैदानावरील पंच), रिचर्ड इलिंगवर्थ (तिसरे पंच).
२१ मार्च- वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडिज- रिचर्ड केटलबोरो व ब्रुस ऑक्झेनफोर्ड (मैदानावरील पंच), रॉड टकर (तिसरे पंच)