विश्वचषकामध्ये बऱ्याच कालावधीपासून खेळणारे, पण अजूनही बाद फेरीत पोहोचू न शकणारे झिम्बाब्वे आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ बुधवारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आतापर्यंत या दोन्ही देशांमध्ये विश्वचषकामध्ये एकही सामना झालेला नाही.
झिम्बाब्वेने आतापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक धक्के दिले आहेत, पण त्यांना मोठी मजल मारता आलेली नाही. कर्णधार एल्टन चिगुंबुराच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिकेला चांगली झुंज दिली होती, पण पराभव पदरी पडला होता. त्यामुळे विश्वचषकातील पहिला विजय मिळवण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ आतूर असेल.
संयुक्त अरब अमिरातीचा संघ विश्वचषकात सातत्यपूर्ण नापास होताना दिसला आहे. त्याच्या नावावर जास्त विजय नाहीत. त्यांच्या मागून येणाऱ्या संघांनी विश्वचषकात कमाल कामगिरी केली आहे. सध्याच्या संघामध्ये खुर्रम खान हा अनुभवी खेळाडू आहे. त्याचबरोबर मुंबईकर स्वप्निल पाटीलच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असेल.

सामना क्र. : ८   झिम्बाबे वि. अरब अमिराती
स्थळ : नेल्सन  ल्ल वेळ : गुरुवारी पहाटे ३.३० वा. पासून
संघ
झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), सिकंदर रझा, रेगिस चकाबव्हा, तेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग इरव्हिन, तफाड्झ्वा कामुनगोई, हॅमिल्टन मसाकाझा, स्टुअर्ट मॅत्सिकेनयेरी, सोलोमन मिरे, तवांडा मुपारिवा, तिनाशे पानयांगरा, ब्रेन्डन टेलर (यष्टीरक्षक), प्रॉस्पर उत्सेया, सीन विल्यम्स.
संयुक्त अरब अमिराती : मोहम्मद तौकीर (कर्णधार), खुर्रम खान (उपकर्णधार), स्वप्निल पाटील (यष्टीरक्षक), सकलेन हैदर (यष्टीरक्षक), अमजद जावेद, मंजुळ गुरुगे, आंद्री बेरेंगर, फहाद अल हाशमी, महंमद नाविद, कामरान शहजाद, कृष्णा के चंद्रन, शैमान अन्वर, अमजद अली, नासिर अझीझ, रोहन मुस्तफा.