News Flash

सट्टे पे सट्टा ; भारतीय संघालाच पसंती!

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेमके काय होईल, याबाबत सट्टेबाजारात बरीच उलटसुलट चर्चा आहे.

| March 5, 2015 12:02 pm

sattaयंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेमके काय होईल, याबाबत सट्टेबाजारात बरीच उलटसुलट चर्चा आहे. पूर्वीप्रमाणे सामना निश्चित होणे कठीण असल्यामुळे एकूणच संघाच्या कामगिरीनुसार सट्टेबाजारात भाव ठरत आहेत. एकेक पराभव स्वीकाराव्या लागलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघाने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अनुक्रमे आर्यलड आणि अफगाणिस्तानविरुद्ध चारशेचा टप्पा पार करून चांगलाच सराव करून घेतला आहे. हे दोन्ही संघ काहीही चमत्कार करू शकतात, याची कल्पना असलेल्या सट्टेबाजाराने त्यामुळे टॉप फाइव्हमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक दिला आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी जो भाव होता त्यात मात्र कमालीचा बदल झाला आहे. भारताने सलग तीन विजय संपादन करून तगडे आव्हान निर्माण केल्याचा परिणाम सट्टेबाजारावर बऱ्यापैकी झाला आहे. वेस्ट इंडिजबरोबर होणाऱ्या भारताच्या सामन्याकडे आता सट्टेबाजाराचे लक्ष आहे. अर्थात भारतालाच पसंती देण्यात आली आहे. न्यूझीलंडचा संघ यंदा विश्वचषक पटकावेल, असाही मतप्रवाह सट्टेबाजारात आहे. अ-गटात न्यूझीलंड तर ब-गटात भारत आघाडीवर आहे. या दोन्ही संघांकडे संभाव्य विजेते म्हणून सट्टेबाज आजही पाहात आहेत. त्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारताला हा सामना जिंकून आपला दबाव कायम ठेवायचा आहे. सट्टेबाजारात त्यामुळेच जोरदार उत्सुकता आहे.
सामन्याचा भाव
भारत           वेस्ट इंडिज
४० पैसे       सव्वादोन रुपये
निषाद अंधेरीवाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 12:02 pm

Web Title: india v west indies betting preview
टॅग : Cricket Betting
Next Stories
1 पोपटपंची : फसवं वळण
2 कपशप : ब्रॉडला अजूनही सतावतोय वरुण
3 संघाची प्रतिष्ठा सांभाळा ; बीसीसीआयचा कोहलीला इशारा
Just Now!
X