News Flash

जंग अभी बाकी है!

गेल्या ३०-४० वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. रंगीत कपडे, पांढरा चेंडू, प्रकाशझोत, रिव्हर्स िस्वग, दुसरा, थर्ड अंपायर, स्टंप कॅमेरा, पॉवर प्ले, स्पायडर कॅम..

| February 15, 2015 04:46 am

जंग अभी बाकी है!

गेल्या ३०-४० वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. रंगीत कपडे, पांढरा चेंडू, प्रकाशझोत, रिव्हर्स िस्वग, दुसरा, थर्ड अंपायर, स्टंप कॅमेरा, पॉवर प्ले, स्पायडर कॅम.. आणि देव जाणे काय? दर wc08दोन-तीन वर्षांनी काहीतरी नवीन घडत राहते या खेळात. सतत बदलत्या या खेळात काही गोष्टी तशाच राहिल्या आहेत, ज्यापकी एक म्हणजे भारत-पाकिस्तान लढतीबद्दलची उत्सुकता. जगभरातील कुठल्याही सामन्याहून साधारणपणे अधिक दर्शक लाभणाऱ्या या झुंजीची उत्कंठा आजही टिकून आहे.
या दोन्ही क्रिकेटवेडय़ा देशांत हा खेळ कुठल्याही धर्मापेक्षा कमी नाही. हा असा एक विषय आहे, जिथे जणू प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि ते दुसऱ्यांवर थोपवण्याचा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे दिसून येते. क्रिकेटची माहिती असो किंवा नसो, पण आपला मुद्दा मांडल्याशिवाय त्यांना चन पडत नाही. या देशांत क्रिकेटपटू (जिंकल्यावर!) पुजले जातात. ऑस्ट्रेलियातदेखील क्रिकेट लोकप्रिय आहे. पण येथे क्रिकेटपटूंना ‘सेलिब्रेटी स्टेटस’ नाही. क्रिकेटपटूंच्या घराबाहेर उभे राहून त्यांची एक झलक बघण्यासाठी कधी गर्दी जमत नाही.
असो, ऑस्ट्रेलियात भारत-पाकिस्तान सामन्यांची तुलना इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील सामन्याशी केली जाते. या ठिकाणी राहणाऱ्या क्रिकेटप्रेमींनाही या थराराची जाणीव आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातून विद्यार्थी उच्च शिक्षणाचे आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये येतात.
सिडनी, मेलबर्न, अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये असे बरेच विद्यार्थी स्थलांतर करतात. नवीन वातावरण, नवीन माणसे, महागडे शिक्षण आणि वाढत्या एकटेपणामुळे कुणीतरी ओळखीचे असावे, ज्याच्याशी संवाद साधता येईल असे वाटते. या परिस्थितीत अगदी कुणाशीही मत्री करायला मन होते, अगदी एका पाकिस्तानमधून आलेल्याशीही. नवीन शहरात आपला देश आणि कुटुंबापासून दूर राहताना, त्यांना एकमेकांचीच सोबत मिळते. हळूहळू अशी जाणीव व्हायला लागते की, हादेखील आपल्यासारख्या एका सामान्य कुटुंबातून आलेला एक साधारण व्यक्ती आहे.
क्रिकेट, राजकारण, दहशतवाद अशा अनेक गोष्टींवर संवाद साधण्याची आणि आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. एवढंच नव्हे, तर दुसरी बाजू ऐकण्याचीही संधी मिळते. आपण कित्येक बाबतींत समान आहोत, याची जाणीव होते. बघता बघता भारत-पाकिस्तानमध्ये काही फरक आहे, हे दोघेही विसरून जातात. बराच काळ गेल्यावर एक भारत-पाकिस्तान सामना येतो, आणि ती ज्वलंत भावना पुन्हा जागृत होते. जगात कुठेही हरलो तरी चालेल, पण पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत हरवायची भावना उत्पन्न होते. फरक एवढाच की यंदा ही भावना फक्त मदानावरच ठेवली तर बरे होईल असे वाटू लागते!
ऑस्ट्रेलियात बऱ्याच ठिकाणी भारतीय आणि पाकिस्तानी मित्र एकत्र बसून भारत-पाकिस्तानचा सामना एकत्र बघतात. गेल्या काही वर्षांत मदानावरचे वैर मदानावरच ठेवण्याची वृत्ती पाहायला मिळते आहे. मदानावर खेळाडूंवर ताण दिसतो, पण त्याचबरोबर थोडे हास्य, गप्पा, मस्करी, चर्चा आणि मत्रीदेखील बघायला मिळते.
दोन्ही देशांमधील वाढता राजकीय तणाव आणि दहशतवादाची वाढती पकड या मत्रीला किती काळ टिकू देतील, याची खात्री देणे कठीण आहे. पण ऑस्ट्रेलियात सध्या तरी मदानाबाहेर मत्रीची ही वृत्ती चालू आहे. माझ्या अशाच एका पाकिस्तानी हॉटेलमालक मित्राने मागच्या विश्वचषक पराभवानंतर गच्च मिठी मारली आणि म्हणाला, ‘‘जीत की बधाई हो भाई, ये बाजी तो आपने मार ली, लेकिन जंग अभी बाकी है, मेरे दोस्त!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2015 4:46 am

Web Title: india vs pakistan cricket war
टॅग : India Vs Pakistan
Next Stories
1 ..अन् राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हाऊन निघाले अॅडलेड ओव्हल
2 विश्वचषकातील महाथरार!
3 इथेच टाका तंबू!
Just Now!
X