‘‘विश्वचषक स्पध्रेत भारताचे फलंदाज चांगल्याच फॉर्मात आहेत आणि बाद फेरीत त्यांच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा आहे,’’ असे मत भारताचा माजी फलंदाज व्ही़ व्ही़ एस़ लक्ष्मणने व्यक्त केले आह़े  
‘‘झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत सुरेश रैनाला सूर गवसल्याचा आनंद झाला आह़े  भारताच्या अव्वल चार फलंदाजांनी आत्तापर्यंत चांगली छाप सोडली आहे आणि ते चांगल्या फॉर्मात दिसत आहेत़,’’ असे लक्ष्मणने सांगितले.
झिम्बाब्वेविरुद्ध रैनाने शतक झळकावले तर महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा संयमी खेळ करून संघाचा विजय निश्चित केला़  त्याने रैनासह पाचव्या विकेटसाठी १९६ धावांची भागीदारी केली़  धोनीच्या या खेळीचे लक्ष्मणने तोंडभरून कौतुक केल़े  तो म्हणाला, ‘‘कोणत्याही परिस्थितीचा स्वीकार करून खेळात बदल करण्याची धोनीची कला मला खूप भावत़े  परिस्थितीचा योग्यरीतीने अभ्यास करून त्यावर त्याच्याकडे तोडगा तयार असतो़  कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी पडली व त्याने ती सार्थकी ठरवली़’’