sattaआंतरराष्ट्रीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काही अनपेक्षित निकालांमुळे महत्त्वाच्या संघांच्या भावांमध्ये चढ-उतार झाला आहे. आपल्या गटात आर्यलडने दोन्ही सामने जिंकले आहेत. विश्वजेतेपदाचा दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिका संघासोबत त्यांची ही लढत त्यामुळेच महत्त्वाची आहे. सलग दोन सामने आर्यलडने जिंकलेले असले तरी सट्टेबाजारात दक्षिण आफ्रिकेलाच झुकते माप दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ बलवान आहे. मात्र भारताबरोबर मोठय़ा फरकाने पराभव स्वीकारावा लागलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आर्यलडला सट्टेबाजांनी फारसा भाव दिलेला नाही. या सामन्याबाबत पंटर्स अधिक उत्साही आहेत. मात्र या सामन्यावर अर्थातच सट्टेबाजाराचे चांगलेच लक्ष आहे. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारात आर्यलडपेक्षा दक्षिण आफ्रिकेलाच सट्टेबाजांचा कौल आहे. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती हे दोन्ही संघ आता सट्टेबाजाराच्या दृष्टीने फारसे लक्षणीय राहिलेले नाहीत. सध्या श्रीलंकेच्या कामगिरीकडे सट्टेबाजांचे लक्ष आहे. इंग्लंडला मागे टाकणारी श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचू शकते आणि हा संघ कोणालाही नमवू शकतो, अशी धारणा सट्टेबाजारात बळावू लागली आहे. याचप्रमाणे भारत विश्वजेतेपदाचा दावेदार असल्याचे सट्टेबाजांचे मत अद्यापही कायम आहे.
सामन्याचा भाव
द. आफ्रिका : ४५ पैसे; आर्यलड- पावणेदोन रुपये.
पाकिस्तान : ३५ पैसे; अमिराती : पावणेतीन रुपये.
निषाद अंधेरीवाला