News Flash

ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिकेला पसंती

भारतीय सट्टेबाज सध्या रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत कमालीचे उत्सुक आहेत.

| February 14, 2015 04:29 am

भारतीय सट्टेबाज सध्या रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत कमालीचे उत्सुक आहेत. या दोन देशांतील सामना हा जागतिक सट्टेबाजांसाठीही पर्वणी ठरत असते. भारतीय पंटर्सनीही या wc11सामन्यांसाठी कोटय़वधी रुपयांचा सट्टा लावला आहे. रविवारच्या सामन्यासाठी भारताला ५० पैसे तर पाकिस्तानला दीड रुपया भाव देऊ करण्यात आला आहे. हा सामना अटीतटीचा होईल, अशी अटकळ बांधून प्रत्येक दहा षटकांसाठी वेगवेगळा भाव दिला आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लड यांच्यातील सामना ऑस्ट्रेलिया तर दक्षिण आफ्रिका -झिम्बाव्वे यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिका सहज विजयी होईल, असा सट्टेबाजांचा दावा आहे. भारतीय सट्टेबाजांनी झिम्बाव्वे जिंकू शकेल, यासाठी एका प्रसंगी ११ रुपये भाव दिला आहे. 

आजचा भाव
ऑस्ट्रेलिया : ३५ पैसे; इंग्लंड : २ रुपये
दक्षिण आफ्रिका : २५ पैसे; झिम्बाव्वे : ३.५० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 4:29 am

Web Title: likes to south africa and australia
Next Stories
1 न्यूझीलंडची विजयी सुरुवात; श्रीलंकेवर ९८ धावांनी मात
2 थरार सुरू..
3 खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से..
Just Now!
X