sattaसध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अनेक अनपेक्षित निकालांमुळे सट्टेबाजारातही अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच अंतिम फेरीत असेल आणि त्यांच्याविरुद्ध न्यूझीलंड वा दक्षिण आफ्रिका असेल, असा होरा व्यक्त केला जात होता. आता न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिका-भारत, भारत-न्यूझीलंड यांनाही पसंती दिली जात आहे. अव्वल संघाबाबतचा क्रम कायम आहे आणि तो असा- ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत आणि श्रीलंका. अव्वल पाच फलंदाजांचा क्रम असा : हशीम अमला, ए बी डी’व्हिलियर्स, कुमार संगकारा, विराट कोहली आणि ब्रेन्डन मॅक्क्युलम. शिखर धवन सहाव्या क्रमांकावर आहे. अव्वल पाच गोलंदाजांना सट्टेबाजांनी दिलेली पसंती अशी : टीम साऊदी, इम्रान ताहीर, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट आणि आर. अश्विन. सुरुवातीला पहिल्या पाचांत भारतीय फलंदाज वा गोलंदाज नव्हते. आता मात्र भारताला सट्टेबाजारात चांगलेच महत्त्व आले आहे. विश्वचषक स्पर्धेत प्लेअरचा सन्मान सट्टेबाजांनी ज्या पाच खेळाडूंना देऊ केला आहे, त्यात भारताचा एकही खेळाडू नाही. ब्रेंडन मॅक्क्युलम, केन विल्यमसन, मिचेल जॉन्सन, डेव्हिड वॉर्नर, ए बी डी’व्हिलियर्स या अव्वल खेळाडूंनंतर सट्टेबाजारात सहावा क्रमांक विराट कोहलीला देण्यात आला आहे. सट्टेबाजारांत आता उलाढाल वाढू लागली आहे. पहिल्या फेरीनंतर त्यात आणखी बदल अपेक्षित आहेत.
सामन्याचा भाव
ऑस्ट्रेलिया : १५ पैसे    अफगाणिस्तान : ३.५० रुपये
बांगलादेश :  ६५ पैसे     स्कॉटलंड : १.२५ रुपये
निषाद अंधेरीवाला