News Flash

तंदुरुस्त शमी विंडीजविरुद्ध खेळणार

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असून, वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

| March 4, 2015 12:05 pm

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीतून सावरला असून, वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या लढतीत शमीच्या जागी खेळणारा भुवनेश्वर कुमार पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. सरावाच्या वेळी भुवनेश्वरच्या पायाच्या घोटय़ाला बँडेज बांधलेले होते. अनवाणी पायांनीच तो पॅव्हेलियनमध्ये परतला. पर्थच्या टणक खेळपट्टीवर गोलंदाजांच्या पायावर भार पडतो. भारतीय संघव्यवस्थपनाने भुवनेश्वरच्या दुखापतीविषयी अधिकृतरीत्या माहिती दिलेली नाही. त्यामुळे पर्थ येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरऐवजी शमीच खेळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2015 12:05 pm

Web Title: mohammed shami fit to play against west indies
टॅग : Mohammed Shami
Next Stories
1 सट्टे पे सट्टा : अनेक शक्यता..
2 पोपटपंची : जिंकण्याची सिद्धता
3 बांगलादेशला विजयाची संधी
Just Now!
X