क्रिकेटच्या मैदानात ‘मेक्सिकन वेव्ह’ साऱ्यांनीच अनुभवल्या असतील, पण त्याच वेळी मैदानात खेळणारे wc18खेळाडू मेक्सिकन पदार्थाचे चाहते असतील तर.. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा मेक्सिकन पदार्थाचा चाहता आहे. त्यामुळे थोडासा निवांत वेळ मिळाल्यावर धोनीने सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांना बरोबर घेऊन एक मेक्सिकन हॉटेल गाठले आणि पदार्थाचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी ‘बुस्ट’ नावाच्या ज्यूसचा आनंद लुटला. जेव्हा हे तिघे हॉटेलमध्ये असल्याची बातमी पसरली तेव्हा चाहत्यांनी एकच गर्दी केली.