popat(डोक्यातून टाकून गळ्यात अडकवता येईल असा दाढीचा विग घेऊन चंपक तोताराम दरबारी येतो.)
तोताराम : हे काय नवीन?
चंपक : लेटेस्ट स्टाइल. हशिम अमला आणि मोईन अली धार्मिक कारणांसाठी दाढी ठेवतात. मात्र त्यांच्या चांगल्या कामगिरीतलं सातत्य पाहून चाहत्यांनी अशा आयत्या दाढीचं स्टाइल स्टेटमेंट केलंय.
तोताराम : काय होईल आयुष्यात एकेक..
चंपक : आपल्याला जो माणूस आवडतो, पटतो त्याला ‘फॉलो’ करायला काय हरकत आहे?
तोताराम : वकिलाप्रमाणे युक्तिवाद करता.
चंपक : आम्ही क्रिकेटची वकिली करतो. वेस्ट इंडिज-झिम्बाब्वेचं सांगा.
(विठ्ठलपंत राणी कलर रंगाचं कार्ड हाती देतात.)
तोताराम : नाचत, गात खेळणाऱ्या माणसांतले बंडोबा थंड झालेत म्हणायचे. पाकिस्तानला इंगा दाखवला त्यांनी. गुणी माणसं खूप आहेत त्यांच्याकडे, क्षमताही तगडी आहे. पण कसं आहे, हा वर्ल्ड कप आहे. चॅरिटी मॅच नाही. गांभीर्य नाही राखलं तर ‘हसत खेळत अभ्यास, सहज परीक्षा नापास’ असं व्हायचं. आकडेवारी त्यांच्याच बाजूने आहे. ती बदलेल असं वाटत नाही. ड्वेन स्मिथसाठी ही शेवटची संधी आहे. झिम्बाब्वेत अवलिया कोणी नाही, पण हीच त्यांची ताकद आहे. ‘अवघे धरू सुपंथ’ तत्त्व त्यांचं. सो वेस्ट इंडिज बी सीरियस.

कपशप : मोईन खानची कॅसिनो यात्रा वादात
कराची : वेस्ट इंडिजच्या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी केलेली कॅसिनो यात्रा पाकिस्तानचे निवड समिती प्रमुख मोईन खान यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोषी आढळल्यास मोईन खान यांच्यावर कारवाई होईल, असे आश्वासन पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरियार खान यांनी दिले. मात्र मोईन यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघावर जोरदार टीका झाली होती. मात्र या पराभवातून कोणताही बोध न घेणाऱ्या पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने नमवले.

spt8