(चंपक ऑस्ट्रेलियाची पिवळी जर्सी आणि काजूकतलीचा मोठा बॉक्स तॅत्सला देतो)
चंपक : तॅत्स कमाल केलीत तुम्ही. असंख्य लोकांना न्यूझीलंड जिंकेल वाटत होतं पण तुम्ही ऑस्ट्रेलियाच म्हणाला होतात. तसंच झालं.
wc04तॅत्स : वर्ल्ड कप आणि त्यातही फायनल मॅच- व्यासपीठ जेवढं मोठं तेवढं त्यांचं वर्चस्व मोठं असतं.
चंपक : वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी तुम्ही म्हणाला होतात- दोस्त के लिए ट्रॉफी तो बनती है आणि मॅचनंतर क्लार्क सेम तेच म्हणाला. हे कसं
काय?
तॅत्स : अहो, तुम्ही टीम इंडियाचे भक्त. आम्हीही कोणाचे तरी डायहार्ड फॅन असणार ना.
चंपक : ओह.. तुम्ही कांगारूंचे समर्थक आहात तर..? सांगितलं नाहीत कधी?
तॅत्स : सांगितलं असतं तर ‘कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ झाला असता आणि सध्या क्रिकेटमध्ये हा शब्द उच्चारणंही पाप आहे.
चंपक : तेही खरंच. आर्यलड- वेस्ट इंडिज अपवाद सोडला तर बाकी सगळ्या मॅचना तुमची भाकीतं अचूक ठरलेत.
तॅत्स : कामाच्या प्रोसेसचा भाग आहे तो. वर्ल्ड कपपूर्वी आपली ओळख होती, पण या स्पर्धेने ऋणानुबंध घट्ट झाले, ते महत्त्वाचं.
चंपक : अगदी खरं. सोमवारी दणक्यात सेलिब्रेशन करू. तुमची टीम जिंकलेय.
तॅत्स : तुम्ही म्हणाल तसं..