25 September 2020

News Flash

पोपटपंची : प्रेक्षणीय ऊर्जा

चंपकराव, उशीर केलात. दमलेले दिसता. चंपक : मजबूत काम होतं. आज तर फोनच करणार होतो, पण म्हटलं तेवढंच चालणं होईल.

| March 3, 2015 12:02 pm

popat(पाठीवर सॅक घेतलेला दमलेला चंपक तोतारामकडे येतो.)
तोताराम :
तोताराम : हे बरं केलंत.
चंपक : रणधुमाळी सुरू पुन्हा एकदा. आफ्रिकेचं काय होणार?
(विठ्ठलपंत हिरव्या रंगाचं कार्ड हाती देतात)
तोताराम : दक्षिण आफ्रिका आर्यलडविरुद्ध जिंकेल. सळसळत्या ऊर्जेमुळे ही लढत प्रेक्षणीय असेल. दक्षिण आफ्रिकेला आपण मातब्बर संघ आहोत हे सिद्ध करावं लागेल. वेस्ट इंडिजने काहीच प्रतिकार केला नव्हता. आर्यलडचं तसं नाही. ते चिवट आहेत. आक्रमण हा त्यांचा स्थायिभाव. आक्रमणाला थोपवलं की अर्धी मोहीम जिंकली. हशिम अमला निद्रिस्त अवस्थेत आहे. जागं होऊन प्रतिस्पध्र्याची झोप उडवण्याची याहून चांगली संधी त्याला मिळणार नाही.
चंपक : पाकिस्तान हरणार का?
तोताराम : चंपकराव तुम्ही पूर्वग्रहदूषित होताय. अगदी जपून आणि सावधपणे पाकिस्तानला खेळावं लागेल. मोठा विजय मिळवून गुणतालिकेत भरारी घेण्याची संधी पाकिस्तानकडे आहे. गुणवत्तेला सातत्याची आणि शिस्तीची जोड दिली तर कमाल करू शकतात ते.
चंपक : पाकिस्तान आणि शिस्त म्हणे. बघू या. पळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:02 pm

Web Title: pakistan and discipline
Next Stories
1 कपशप : ..अन् अ‍ॅम्ब्रोज गोलंदाजीला आला
2 पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांसाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली
3 सिली पॉइंट : छोटे मासे, मोठे मासे!
Just Now!
X