25 September 2020

News Flash

पाकिस्तानपुढे अमिरातीचे आव्हान

पराभवाच्या चक्रव्यूहातून विजयाच्या वाटेवर परतणाऱ्या पाकिस्तानला बुधवारी संयुक्त अरब अमिरातीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

| March 3, 2015 04:55 am

पराभवाच्या चक्रव्यूहातून विजयाच्या वाटेवर परतणाऱ्या पाकिस्तानला बुधवारी संयुक्त अरब अमिरातीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अमिरातीच्या संघाला गेल्या सामन्यात भारताने सहज पराभूत केले होते, त्यामुळे त्यांना आपले स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे असेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. पण दोन्ही संघांमध्ये पाकिस्तानकडे अनुभव जास्त असल्यामुळे अमिरातीसारख्या लिंबू-टिंबू संघापुढे पाकिस्तानचा संघ वरचढ ठरू शकेल.
पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक शिवाय एकालाही फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे फलंदाजी हा पाकिस्तानचा कच्चा दुवा आहे. पाकिस्तानकडे अनुभवी गोलंदाज नसले तरी मोहम्मद इरफान आणि वहाब रियाझ यांनी गेल्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध अचूक मारा केला होता. पाकिस्तानला आतापर्यंत तरी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसून त्यांना बाद फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असेल.
अमिरातीच्या फलंदाजांमध्ये शैमान अन्वरने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून खुर्रम खानकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. मुंबईकर स्वप्निल पाटीलला अजूनही दमदार कामगिरी करण्यात यश मिळालेले नाही.

सामना क्र. : २५   पाकिस्तान वि.  अमिराती
स्थळ : नेपिअर  ल्ल  वेळ : बुधवारी पहाटे ६.३० वा. पासून

संघ
पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहझाद, मोहम्मद हाफीझ, सर्फराझ अहमद, युनिस खान, हरिस सोहेल, उमर अकमल, शोएब मकसूद, शाहिद आफ्रिदी, यासिर शाह, मोहम्मद इरफान, जुनैद खान, एहसान अदिल, सोहेल खान, वहाब रियाझ.
संयुक्त अरब अमिराती : महंमद तौकीर (कर्णधार), खुर्रम खान (उपकर्णधार), स्वप्निल पाटील (यष्टिरक्षक), सकलेन हैदर, अमजद जावेद, मंजुळ गुरुगे, आंद्री बेरेंगर, फहाद अल हाशमी, महंमद नाविद, कामरान शहजाद, कृष्णा के चंद्रन, शैमान अन्वर, अमजद अली, नासिर अझिझ, रोहन मुस्तफा.

थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 4:55 am

Web Title: pakistan to face united arab emirates on wednesday
Next Stories
1 आयरिश चाचणी
2 हशिम अमलाने मोडला विराट कोहलीचा विक्रम
3 क्रिकेटसंघ हे ‘मोबाईल अॅप्स’ असते तर…
Just Now!
X