भारत आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरे गेल्यानंतर पाकिस्तानने खेळात सुधारणा करत विजय मिळवले आहेत. मात्र तरीही त्यांच्या फलंदाजीची अवस्था चिंताजनक आहे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. 

‘‘पाकिस्तानच्या गोलंदाजीची चिंता नाही. डावखुऱ्या त्रिकुटाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र फलंदाजीत सातत्य नाही. धावांचा पाठलाग करताना तर पाकिस्तानच्या फलंदाजांची घसरगुंडी उडते. आर्यलडसारख्या संघावर मात करायची असेल तर फलंदाजीत आमुलाग्र सुधारणा करायला हवी,’’ असे अख्तरने सांगितले.
तो पुढे म्हणतो, ‘‘पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकल्यास प्रथम फलंदाजी स्वीकारावी आणि आर्यलडसमोर प्रचंड धावसंख्येचे लक्ष्य ठेवावे.’’