(हताश चेहऱ्याने चंपक तोतारामच्या खोपटात येतो)
तोताराम : चंपकराव, काय झालं? एवढी खिन्नता कसली?
चंपक : खिन्न होणारच ना? आज दोन्ही मॅच बघितल्या. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज पुढे गेले. आर्यलड logo08घरी.
तोताराम : तुमचा लाडका धोनी म्हणतो तशा प्रोसेसचा भागच तो..!
चंपक : आर्यलड प्रत्येक मॅचमध्ये चांगलं खेळलं, आणि त्याहीपेक्षा वेस्ट इंडिजच्या तुलनेत त्यांची कामगिरी प्रमुख संघ वाटावा अशी होती. मनमौजी कारभारवाले वेस्ट इंडिज बाद फेरीत. अन्याय आहे हा.. आणि वरती भर म्हणजे पाकिस्तानही उपांत्यपूर्व फेरीत.
तोताराम : आर्यलडबद्दल तुम्हाला वाईट वाटणं समजू शकतो, पण पाकिस्तानने मेहनत करून बाद फेरी गाठली आहे.
चंपक : आर्यलडने वेस्ट इंडिजला नमवलं, झिम्बाब्वेला हरवलं, वेस्ट इंडिजने काय केलंय?
तोताराम : जे होतं ते चांगल्यासाठी. आता काय आयसीसीविरोधात याचिका दाखल करणार का तुम्ही?
चंपक : लई वेळ जातो त्यात. आपण निषेध करायचा. त्याला काही लागत नाही. बाकी तुम्ही म्हणाला होतात त्याप्रमाणे पाकिस्तानने सगळे हिशेब चुकते केले आणि वेस्ट इंडिजनेही ऐकलं तुमचं.
तोताराम : साहजिक होतं ते.
चंपक : लिंबूटिंबू घरी गेले आता. आता तुमची खरी कसोटी!
तोताराम : चालतंय की. तावून-सुलाखून निघाल्यावरच सोन्याची परीक्षा होते. येत जा तुम्ही.
चंपक : मी आता घरी निघतो. भेटूच..!