News Flash

दडपण आमच्यापेक्षा ऑस्ट्रेलियावर- सर्फराझ अहमद

आम्ही आतापर्यंत सकारात्मक क्रिकेट खेळत आलो आहोत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली

| March 18, 2015 12:05 pm

आम्ही आतापर्यंत सकारात्मक क्रिकेट खेळत आलो आहोत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली, तरी यजमान म्हणून त्यांच्यावर अधिक दडपण असेल, असे मत पाकिस्तानचा सर्वात फॉर्मात असलेला फलंदाज आणि यष्टीरक्षक सर्फराझ अहमदने व्यक्त केले. ‘‘ऑस्ट्रेलियावर अपेक्षांचे आझे फार जास्त असेल, तर दुसरीकडे आम्ही आक्रमकवृत्तीनेच मैदानात उतरू. यापूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियाबरोबर बरेच क्रिकेट खेळले आहोत. त्यामुळे त्यांच्या खेळाचा आम्ही अभ्यास केला आहे. त्यांच्याकडे तीन डावखुरे गोलंदाज आहेत, या गोष्टीचा फायदा कसा उचलायचा हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. चांगली सुरुवात करून विजय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू,’’ असे सर्फराझ म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:05 pm

Web Title: pressure on australia not pakistan says sarfraz
Next Stories
1 पाकिस्तानची भीती वाटते -वॉटसन
2 सट्टे पे सट्टा : विश्वविजेता कोण?.. ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड?
3 पोपटपंची : खारीचा वाटा!
Just Now!
X