popat(पाठीवर दोन शून्य कोरलेली पिवळी धम्मक जर्सी घालून चंपक तोतारामकडे येतो.)
तोताराम : आजच रंगपंचमी साजरी करताय की काय?
चंपक : ही प्रेरणा जर्सी आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू याच रंगाची जर्सी घालतात.
तोताराम : काय एकेक खूळ डोक्यात घ्याल..
चंपक : नादखुळा म्हणा हवं तर. बाकी तुम्ही सांगितलंत त्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने विजय साकारले. आपण जिंकणार ना वेस्ट इंडिजविरुद्ध?
तोताराम : मॅच तर शुक्रवारी आहे.
चंपक : होळीची आणि रंगपंचमीची तयारी, वेळ मिळणार नाही उद्या. एकदम कल्ला करतो आम्ही.
(विठ्ठलपंत निळ्या रंगाचं कार्ड देतात)
तोताराम : सरळसोट रस्त्यावर गाडी भरधाव वेगात धावत असते. पण खरा कस घाटातच लागतो. आपण विजयाची हॅट्ट्रिक साजरी केलेय. वेस्ट इंडिज हे फसवं वळण. ते बेभरवशी आहेत हाच सगळ्यात मोठा धोका. मार्लन सॅम्युअल्सला रोखावं लागेल. शिखर-रोहित-विराट त्रिकुट महत्त्वाचे. डॅरेन सॅमी आणि आंद्रे रसेलला गांभीर्याने घ्यायला हवं. आपल्याविरुद्धचा दौरा अर्धवट सोडून ते घरी परतले होते. या निर्णयाने त्यांचं अपरिमित नुकसान झालंय. विजयासह होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी सगळी शस्त्रं परजावी लागतील.