सर्वाधिक सहा विश्वचषकामध्ये भारताचे नेतृत्व केलेला भारताचा महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला यंदाच्या स्पर्धेबाबत फार उत्सुकता आहे. यंदाचा विश्वचषक नवीन नियमांनुसार होणार असून, या स्पर्धेत सर्वोत्तम स्पर्धा पाहायला मिळेल, असे मत सचिनने व्यक्त केले आहे.
‘‘या स्पर्धेत सर्वात जास्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे. क्रिकेटमधील काही नियम बदलण्यात आले आहेत, त्याचबरोबर ट्वेन्टी-२० क्रिकेटचा एकदिवसीय क्रिकेटवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच वेगळा असेल. या विश्वचषकामध्ये फलंदाजीमध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसतील. या विश्वचषकाबद्दल माझ्या मनात फार उत्कंठा आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत,’’ असे सचिन म्हणाला.