श्रीलंकेच्या कुमार संगकाराने विश्वचषक स्पर्धेत बुधवारी स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम रचला. संगकारने स्कॉटलंडविरुद्ध १२४ धावांची धुंवाधार खेळी करून यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आपले सलग चौथे शतक साजरे केले. या शतकासह संगकारा विश्वचषकात सलग चार शतके ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. कुमार संगकाराने स्कॉटलंडविरुद्ध केवळ ९५ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह १२४ धावा ठोकल्या. संगकारा सध्या दमदार फॉर्मात असून यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत ४९५ धावा ठोकून तो अव्वल स्थानी आहे.
योद्धा संगकाराचे नवे शिरस्त्राण!
दरम्यान, होबार्टवर सुरू असलेल्या स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱया श्रीलंकन संघाने ३६४ धावांचा डोंगर उभारला आहे. यामध्ये संगकारा आणि दिलशानने दुसऱया विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. दिलशानने संगकाराला साथ देत ९९ चेंडूंमध्ये दहा चौकार आणि एका षटकारासह १०४ धावांची खेळी केली.