News Flash

विजयाचा निश्चय

ते काही ठाऊक नाही आपल्याला, पण आपटलात तर ते कॉर्पोरेटवाले काळजी घेणार का तुमची?

| March 8, 2015 05:34 am

(स्मार्टफोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज टाइप करत चंपक तोतारामकडे येतो.)
तोताराम : चंपकराव समोर बघून चाला. धडपडाल.
wc13चंपक : सवय झालेय आता. मल्टिटास्किंग म्हणतात याला कॉर्पोरेट भाषेत.
तोताराम : ते काही ठाऊक नाही आपल्याला, पण आपटलात तर ते कॉर्पोरेटवाले काळजी घेणार का तुमची?
चंपक : तुम्ही ना शब्दात पकडता. आर्यलड-झिम्बाब्वे काय सॉलिड मॅच झाली. तुम्ही सांगितलंत तशी धमाल मॅच झाली. पण आफ्रिकेने घोळ घातला.
तोताराम : कसं आहे, काही मूलभूत गोष्टी कसोशीने पाळायच्या असतात. अनेकदा त्याला चिकटून राहिलं ना तरी सोपं होतं सगळं. पण काल सांगितलं तसं सगळं आहे, मग कशाचा कुठे उपयोग करायचा यातच गोंधळलेत ते.
चंपक : ऑस्ट्रेलिया बाजी मारणार ना श्रीलंकेविरुद्ध?
(विठ्ठलपंत पिवळं कार्ड हाती देतात)
तोताराम : हा ऑस्ट्रेलियाचा संघ हरवताच येणार नाही अशातला नाही. श्रीलंकेच्या प्रत्येकाने निश्चय केला तर जमू शकतं. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरच्या आणि शाब्दिक आक्रमणाला तोंड द्यायला संगकारा समर्थ आहे. ऑस्ट्रेलियासाठी क्लार्क महत्त्वाचा आहे. सिडनीत फिरकी चालते. फलंदाजी घेऊन साडेतीनशे करायच्या आणि नंतर नियमितपणे विकेट हे ऑस्ट्रेलियाचे डावपेच त्यांना जिंकून देऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 5:34 am

Web Title: seeks victory
Next Stories
1 बदलती समीकरणे
2 पोपटपंची : तोफांचे प्रश्न
3 सट्टे पे सट्टा ; शिखर धवन पहिल्या पाचांत
Just Now!
X