News Flash

आफ्रिकन लढाई

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या आफ्रिका खंडातील दोन असमान संघांमध्ये मुकाबला आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून दक्षिण आफ्रिका शर्यतीत आहे, तर झिम्बाब्वे गतवैभवाला जागत प्रतिष्ठा

| February 14, 2015 04:34 am

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या आफ्रिका खंडातील दोन असमान संघांमध्ये मुकाबला आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून दक्षिण आफ्रिका शर्यतीत आहे, तर झिम्बाब्वे गतवैभवाला जागत प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. सराव सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवल्याने झिम्बाब्वेचा आत्मविश्वास उंचावला आहे, मात्र दक्षिण आफ्रिकेला सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. झिम्बाब्वेला सराव सामन्यातला फॉर्म कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. हशिम अमला, एबी डीव्हिलियर्स, जेपी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर आणि क्विंटन डि कॉक यांच्या रूपात आफ्रिकेकडे फलंदाजांची मोठी फळी आहे. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि व्हरनॉन फिलँडर हे त्रिकूट गोलंदाजीचा आधारस्तंभ आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतींमध्ये दक्षिण आफ्रिकेने नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. दणदणीत विजयी सलामी देत विश्वचषक अभियानाची आदर्श सुरुवात करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आतुर आहे.
ब्रेंडान टेलर, हॅमिल्टन मासाकाटझा, स्टुअर्ट मॅटसिकेनरी या अनुभवी त्रिकुटावर झिम्बाब्वेची भिस्त आहे. प्रॉस्पर उत्सेयाला गोलंदाजांच्या शैलीची काळजी घेत धावा रोखणे आणि विकेट्स मिळवणे, अशी तिहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. एल्टॉन चिगंबुराकडून अष्टपैलू खेळाची अपेक्षा आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजासमोर आफ्रिकेच्या सूर गवसलेल्या फलंदाजांना रोखण्याचे कठीण आव्हान आहे. दिवस-रात्र लढतींचा अपुरा अनुभव झिम्बाब्वेसाठी त्रासदायक ठरू शकतो.

सामना क्र. : ३ द. आफ्रिका वि. झिम्बाब्वे (ब-गट)
स्थळ : हॅमिल्टन, सेडन पार्क ल्ल वेळ : सकाळी ६.३०

लक्षवेधी खेळाडू
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका): भन्नाट वेग आणि अचूकतेसह फलंदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साहाय्यकारी नसलेल्या खेळपट्टीवरही प्रभावी मारा करण्याचे कसब. विश्वचषकात खेळण्याचा पूर्वानुभव आणि मोक्याच्या क्षणी बळी घेण्याच्या क्षमतेमुळे प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी.
हॅमिल्टन मासाकाटझा (झिम्बाब्वे) : प्रदीर्घ अनुभव असल्याने झिम्बाब्वेच्या फलंदाजीचा आधारस्तंभ. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांचा समर्थपणा सामना करू शकतो. झिम्बाब्वेच्या विजयात नेहमीच मोलाचे योगदान देणारा खेळाडू. सराव सामन्यात श्रीलंकेसारख्या अव्वल संघाविरुद्धच्या विजयात शतकी योगदानामुळे आत्मविश्वास उंचावलेला खेळाडू.

बोलंदाजी
सलामीच्या लढतीसाठी डेल स्टेन पूर्णपणे तंदुरुस्त आणि ताजातवाना असावा यासाठीच न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. सराव सामन्यात त्यांनी श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांना कमी लेखून, बेसावध राहण्याची चूक आम्ही करणार नाही. अतिशय गांभीर्याने आम्ही या सामन्यात उतरू.
– अ‍ॅलन डोनाल्ड, (द. आफ्रिकेचा गोलंदाजी प्रशिक्षक)
प्रकाशझोतात सामने खेळण्याचा आम्हाला पुरेसा अनुभव नाही, मात्र न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्यापासून आम्ही त्याचाच सराव करत आहोत. दक्षिण आफ्रिका मातब्बर संघ आहे, त्यांच्यासमोर सर्वोत्तम खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
हॅमिल्टन मासाकाटझा (झिम्बाब्वे)

आमने सामने
सामने ३७ – दक्षिण आफ्रिका : ३४ ’झिम्बाब्वे : २ ’ टाय / रद्द : १
संघझिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), सिकंदर रझा, रेगिस चकाबव्हा, तेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग इरव्हिन, तफाड्झ्वा कामुनगोई, हॅमिल्टन मसाकाझा, स्टुअर्ट मॅत्सिकेनयेरी, सोलोमन मिरे, तवांडा मुपारिवा, तिनाशे पानयांगरा, ब्रेन्डन टेलर (यष्टीरक्षक), प्रॉस्पर उत्सेया, सीन विल्यम्स.
दक्षिण आफ्रिका : एबी डीव्हिलियर्स (कर्णधार), क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), हशिम अमला, फॅफ डू प्लेसिस, जेपी डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, व्हरनॉन फिलँडर, कायले अबॉट, अल्फान्सो फॅनसिंगो, इम्रान ताहीर, वेन पार्नेल, फरहान बेहराडीन, रिले रोसू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 4:34 am

Web Title: south africa vs zimbabwe
Next Stories
1 वादाची राख..
2 ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिकेला पसंती
3 न्यूझीलंडची विजयी सुरुवात; श्रीलंकेवर ९८ धावांनी मात
Just Now!
X