03 March 2021

News Flash

..म्हणून बांगलादेश बाद फेरीत पोहोचला!

आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली, म्हणूनच आम्ही बाद फेरीत पोहोचलो आहोत. आम्हाला कोणतीही गोष्ट सिद्ध करायची नाही,

| March 17, 2015 03:28 am

आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली, म्हणूनच आम्ही बाद फेरीत पोहोचलो आहोत. आम्हाला कोणतीही गोष्ट सिद्ध करायची नाही, असे मत बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हातुरसिंघे यांनी व्यक्त केले आहे.
‘‘आम्हाला काहीही सिद्ध करायचे नाही, आम्ही चांगला खेळ करतोय आणि ते आम्हाला माहिती आहे, त्यामुळेच आम्ही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही प्रत्येक सामन्यामध्ये खेळाचा आनंद लुटला आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. पण त्यांच्या गोलंदाजीची सुरुवात कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत,’’ असे हातुरसिंघे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 3:28 am

Web Title: the good performance take bangladeshi into quarter final say chandika hathurusingha
Next Stories
1 पूर्वपरीक्षेत पहिले, पण जडेजाचं करायचं काय!
2 ‘शतक’चषक!
3 संगकाराने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा -जयसूर्या
Just Now!
X