08 March 2021

News Flash

विश्वचषक २०१५: आता पंचांमधील संभाषणही प्रसारीत होणार

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बुधवारपासून होणाऱया बाद फेरीत सामन्यांच्या पंचांमधील होणारे संभाषण देखील प्रसारीत करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने(आयसीसी) घेतला

| March 17, 2015 03:47 am

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बुधवारपासून होणाऱया बाद फेरीत सामन्यांच्या पंचांमधील होणारे संभाषण देखील प्रसारीत करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने(आयसीसी) घेतला आहे. या निर्णयामुळे मैदानातील दोन्ही पंच व तिसरे पंच यांच्यात होणारे संभाषण क्रिकेट रसिकांना ऐकता येणार आहे. सामन्यात महत्त्वाच्या निर्णयावेळी पंचांमध्ये होणारी चर्चा, गोलंदाजाशी होणारी सल्लामसलत आणि तिसऱया पंचांकडे सोपविण्यात आलेला निर्णय या सर्व प्रक्रियांमधील पंचांचे संभाषण आता क्रिकेट रसिकांना लाईव्ह ऐकायला मिळणार आहे.
बुधवारी होणाऱया बाद फेरीच्या श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका सामन्यापासून ते अंतिम फेरीपर्यंत सर्व सामन्यांमधील पंचांच्या संभाषणाचे लाईव्ह फिड विश्वचषक स्पर्धेचे वितरक असलेल्या स्टार स्पोटर्सला देण्यात येणार आहे. याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेदरम्यान पंचांचे संभाषण लाईव्ह प्रसारीत करण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 3:47 am

Web Title: umpire communications to be on air for knockout stages
Next Stories
1 ..म्हणून बांगलादेश बाद फेरीत पोहोचला!
2 पूर्वपरीक्षेत पहिले, पण जडेजाचं करायचं काय!
3 ‘शतक’चषक!
Just Now!
X