सातत्यपूर्ण प्रदर्शनासह फलंदाजीत भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या विराट कोहलीने ‘फेसबुक’वरही विक्रमांचे शिखर गाठले आहे. भारतीय क्रीडापटूंमध्ये सचिन तेंडुलकर नंतर ‘फेसबुक’वर सर्वाधिक फॉलोअर्सचा मान विराटने पटकावला आहे. विराटला ‘फॉलो’ करणाऱ्यांची संख्या दोन कोटींहून अधिक झाल्याचे फेसबुकने जाहीर केले आहे. तेंडुलकर २,४७,७५,१३८ फॉलोअर्ससह क्रीडापटूंमध्ये अव्वल स्थानी आहे. ‘फेसबुक’वर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जागतिक क्रीडापटूंच्या यादीत तेंडुलकर १३व्या तर कोहली २०व्या स्थानी आहे. पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो १० कोटी ७० लाख फॉलोअर्ससह अव्वल स्थानी आहे. बार्सिलोना क्लब आणि अर्जेटिनाची ओळख असलेला लिओनेल मेस्सी ७ कोटी ८० लाख फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘ट्विटर’वर कोहलीने तेंडुलकरला मागे टाकले आहे, मात्र ‘फेसबुक’वर अद्यापही मास्टर ब्लास्टरचीच चलती आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 5:51 am