मैदानात खेळताना फटक्यांमध्ये वेगवेगळे बदल करणारा भारताचा फलंदाज विराट कोहली आपल्या खास फॅशनसाठीही ओळखला जातो. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी कोहलीने आपल्या केशरचनेमध्येही बदल केला आहे. कोहलीने ‘मोहवक’ नावाचा हेअर कट केला असून यापूर्वी ही स्टाइल फुटबॉलमधील अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने केली होती. २००२च्या फुटबॉल विश्वचषकात इंग्लंडच्या डेव्हिड बॅकहेमनेही अशीच केशरचना ठेवली होती.