विराट कोहली हा भारताचा सध्याचा आघाडीचा फलंदाज असेलही, पण फक्त त्याच्यावरच भारतीय संघाची फलंदाजी अवलंबून नाही, असे स्पष्ट मत दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी व्यक्त केले आहे.
‘‘सर्वानाच माहिती आहे की विराट कोहली हा एक अद्वितीय फलंदाज आहे, त्याचे विक्रमही आपल्याला माहिती आहेत. तो सध्याच्या घडीला भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज आहे, पण त्याच्यावरच फक्त भारतीय संघ अवलंबून नाही. सुरेश रैना, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी हे दर्जेदार फलंदाज असून त्यांच्याबाबतही आम्ही चर्चा केली,’’ असे डोमिंगो यांनी सांगितले.

‘‘माझ्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीमध्ये मी कधीही क्रीडा मानसोपचारतज्ज्ञाची गरज घेतली नाही. पॅडी अप्टन हा आयुष्याबद्दल फार चांगले बोलतो, मार्गदर्शनही करू शकतो, पण तो क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ मात्र नक्कीच नाही.’’
-रसेल डोमिंगो