sattaआर्यलंडसह बांगलादेश, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, स्कॉटलंड या संघांकडून सट्टेबाजांच्याही फारशा अपेक्षा नाहीत. भारत-पाकिस्तान सामन्यामुळे भारतीय सट्टेबाजारात तरी उत्साह संचारला आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावर जोरदार सट्टा लावला जाईल, अशी आशा आहे. या सामन्यात सट्टेबाजांची दक्षिण आफ्रिकेलाच पसंती आहे. येत्या रविवारी होणारा हा सामना सुरू होईपर्यंत भावात चढउतार असेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावणारा भारताचा विराट कोहली फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आरोन फिंच अद्याप आपला क्रमांक टिकवून आहे. गोलंदाजांमध्ये हा मान सट्टेबाजांनी मिसेल स्टार्चला दिला आहे. बांगलादेश-अफगाणिस्तान तसेच झिम्बाब्वे-संयुक्त अरब अमिराती यांच्यातील सामन्यांबाबत भारतीय सट्टाबाजारात फारशी उत्सुकता नाही. परंतु पंटर्सच्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांनी या सामन्यांमध्ये अनुक्रमे बांगलादेश आणि झिम्बाब्वेला पसंती दिली आहे. अजून महत्त्वाचे सामने व्हायचे आहेत. त्यामुळे सट्टेबाजारातला ज्वर आणखी वाढतच जाणार आहे.
आजचा भाव
बांगलादेश : २० पसे,  अफगाणिस्तान : चार रुपये
झिम्बाव्वे : १५ पैसे, संयुक्त अरब अमिराती : ५ रुपये

निषाद अंधेरीवाला

सोशल कट्टा
विश्वचषक २०१५चे संभाव्य विजेते..
आयर्लंड आणि स्कॉटलंड!