News Flash

ख्रिस गेलची विस्फोटक खेळी, विश्वचषकात द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू

विश्वचषक स्पर्धेत गेल्या दोन सामन्यांमध्ये शांत असलेले ख्रिस्तोफर गेल नावाच्या वादळाने मंगळवारी भयाण रुप धारण केलं. 'द ग्रेट डिस्ट्रॉयर' म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस

| February 24, 2015 12:51 pm

विश्वचषक स्पर्धेत गेल्या दोन सामन्यांमध्ये शांत असलेले ख्रिस्तोफर गेल नावाच्या वादळाने मंगळवारी भयाण रुप धारण केलं. ‘द ग्रेट डिस्ट्रॉयर’ म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने झिम्बाव्बे विरुद्धच्या सामन्यात १४७ चेंडूत २१५ धावांची विस्फोटक खेळी साकारून विश्वचषक स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. ख्रिस गेल विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला असून त्याने क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडीस काढला. याआधी सचिनने कमीतकमी १४७ चेंडूत द्विशतक गाठले होते. गेलने यावेळी १६ षटकार आणि ९ चौकारांसह अवघ्या १३८ चेंडूत द्विशतक गाठले.
महत्त्वाचीबाब अशी की, २०१० साली याच दिवशी सचिन तेंडुलकरने ग्वालियारच्या स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरोधात १४७ चेंडूत द्विशतकी खेळी साकारुन एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला होता. यावेळी ख्रिस गेल विश्वचषक स्पर्धेत पहिले द्विशतक झळकावणारा खेळाडू ठरला. या द्विशतकी खेळीसह गेलने रोहित शर्माच्या १६ षटकारांच्या विक्रमाशीही बरोबरी साधली.  तसेच जोडीदार मार्लोन सॅम्यूअल्ससोबत तब्बल ३३२ धावांची भागीदारी रचून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱया विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील रचला. सॅम्यूअल्सने ख्रिस गेलला साथ देत १३३ धावांची खेळी साकारली आहे. या दोघांच्या भक्कम फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेसमोर ३७२ धावांचा डोंगर उभा केला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 12:51 pm

Web Title: west indies ride on chris gayle ton against zimbabwe
Next Stories
1 सट्टे पे सट्टा : अंदाज चुकला!
2 पोपटपंची : गांभीर्याची सीरियस गोष्ट
3 विश्वचषकात सलग दोन पराभवांमुळे पाकच्या पंतप्रधानांविरोधात याचिका!
Just Now!
X