sattaदक्षिण आफ्रिका-श्रीलंका, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान आणि न्यूझीलंड-वेस्ट इंडिज या उपान्त्य फेरीतील सामन्यांचा विचार केला तर भारत नशीबवान म्हणायला हवा. बांगलादेशविरुद्ध सहज विजय अपेक्षित असल्यामुळे भारत उपान्त्य फेरीत धडकणार, याबाबत कोणा ज्योतिषीचीही गरज नाही. सट्टेबाजारात त्यामुळेच भारत आणि बांगलादेश या सामन्याबाबत जास्त उत्सुकता नाही. कच्च्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशने यापूर्वी भारताला हरवून चमत्कार केला आहे. परंतु हा चमत्कार आता होऊ शकत नाही, असे सट्टेबाजांना वाटते. त्यामुळेच भारताचा विजय निश्चित आहे आणि त्यासाठी त्यांनी आता फक्त १० पैसे देऊ केले आहेत. बांगलादेशसाठी पाच रुपये भाव दिला असला तरी सट्टेबाजारात त्याबाबत उत्साह नाही. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होईल, असा सट्टेबाजांचा होरा आहे. आताचा भाव आहे दक्षिण आफ्रिका ६५ पैसे तर श्रीलंका सव्वा रुपया. याचा अर्थ सट्टेबाजांनी जसे दक्षिण आफ्रिकेला झुकते माप दिले आहे, त्याप्रमाणे त्यांची श्रीलंकेलाही पसंती आहे. प्रत्यक्ष सामन्यातील नाणेफेक, प्रथम फलंदाजी कोण करील आणि पहिल्या १० षटकांत संघाची काय स्थिती असेल, यावरही बऱ्याच वेळा सट्टय़ाचा भाव ठरत असतो. या दोन्ही संघातील चुरशीच्या लढतीत सट्टेबाजांना हेच अपेक्षित आहे. भारताला आताही तिसरा क्रमांकच सट्टेबाजांनी दिला आहे. अजूनही विश्वविजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड या संघांनाच सट्टेबाजांची पसंती आहे.
सामन्याचा भाव
    दक्षिण आफ्रिका     श्रीलंका
    ६५ पैसे            सव्वा रुपया