popat(भुलाललाला लेलेलो.. भुलाला ले लो असं गाणं गुणगुणत चंपक अवतरतो.)
तोताराम : गेल म्हणजे चक्रीवादळ आहे. त्या मार्सियापेक्षा डेंजर. अमानवी वाटेल असा खेळतो.
चंपक : एक्झ्ॉक्टली. सुरुवातीला निवांत होता. मग पार सोलूनच काढलं.
तोताराम : चंपकशेठ एक लक्षात घ्या. चक्रीवादळ सारखं सारखं येत नाही. लहरीपणा हे त्याचं वैशिष्टय़. पुढच्या सामन्यात शून्यावर स्वारी तंबूत असेल.
चंपक : तुम्ही बुवा फारच निगेटिव्ह राव. आज छप्पर फाड के रन केल्यात ना. बास्स ना, उद्याचं कोणी पाहिलंय.
तोताराम : आम्ही तेच तर पाहतो.
(विठ्ठलपंत अर्ध हिरवं-अर्ध जांभळं असं कार्ड देतात.)
तोताराम : आर्यलड जिंकणार. यांना जिंकायला आवडतं. त्यासाठी मेहनत करायलाही ते तयार असतात. ओ’ब्रायन बंधूंप्रमाणे एड जोयस, पॉल स्टर्लिग कामाची माणसं. अ‍ॅण्डी बलर्बिनीची ऊर्जा चैतन्यमयी. अमिरातीविरुद्ध दणदणीत विजय मिळवला तर आर्यलडला उपांत्यपूर्व फेरीचे दार उघडू शकते.
चंपक : अफगाणिस्तान-स्कॉटलंड?
तोताराम : कट्टर होईल मॅच. टाइमपास मॅच म्हणून लोक म्हणतील पण ही मॅच पाहण्यासारखी होईल. एकांगी मॅच नसेल.
चंपक : आता तुम्ही म्हणताय म्हणून पाहीन. पळतो.

कपशप :धोनी-कोहलीत आलबेल
पर्थ  : महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात कथित शीतयुद्धाच्या बातम्या अगदी रंजकपणे जगासमोर मांडल्या जातात, परंतु या दोघांमध्ये कोणतीही कटुता नसून ते चांगले मित्र असल्याचा प्रत्यय वारंवार आला आहे. मंगळवारी येथील हॉटेल हयातमध्ये दाखल होताच हीच प्रचीती पुन्हा आली. थ्री फोर्थ घातलेला विराट आणि लाल रंगाचे टी शर्ट व हिरवी पँट घातलेला धोनी अगदी लहानपणीच्या मित्रासारखे एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. त्यांच्या या गप्पा पाहून त्यांच्यातील शीतयुद्ध या अफवाच असल्याचे कळते. धोनी अगदी हसतमुखाने विराटशी गप्पा मारत होता, तर विराटच्या नजरा धोनीच्या आय पॅडवर खिळल्या होत्या. या दोघांच्या चर्चेत मोहम्मद शमी सामील होताच तिघांनी हॉटेल सोडले.