भारतीय सट्टेबाजाराला सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या सामन्याचेच वेध लागले आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यातील भारताच्या दणदणीत विजयामुळे आता सट्टेबाज आशावादी झाले आहेत. wc11भारताकडे ते आता विश्वचषकाचा संभाव्य विजेता म्हणून पाहू लागले आहेत. रविवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा भाव आता सव्वा रुपयावर येऊन पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेलाच सट्टेबाजांची पसंती असून आता ३५ पसे असा भाव देऊ केला आहे. यात आणखी चढउतार होईल, असा होरा आहे.
िलबू-टिंबू संघांसाठी सट्टेबाजांनी फारसा भाव दिलेला नाही. मात्र आर्यलडने सट्टेबाजांचे लक्ष वेधून घेतले आहे. चमत्कार करणाऱ्या संघांना नेहमीच सट्टेबाजारात महत्त्व असते. तसे महत्त्व अद्याप तरी अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती वा स्कॉटलंड संघाने मिळवलेले नाही.
भारताच्या विराट कोहलीचा भाव भारतीय सट्टेबाजारात चांगलाच वधारतोय. गोलंदाजांपकी अद्याप कुणालाही फारशी पसंती मिळालेली नाही. मात्र भारत अंतिम पाच संघांत आपले स्थान टिकवून आहे.
न्यूझीलंड-इंग्लंड या विश्वचषकाच्या दावेदार असलेल्या संघांमधील लढतीसाठी आता सट्टेबाजार सज्ज झाला आहे. सध्या तरी न्यूझीलंडला झुकते माप आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहोचण्यासाठी अक्षरश: झगडावे लागले. त्याचा फारसा परिणाम सध्या तरी सट्टेबाजारावर झालेला नाही. मात्र या सामन्यातील निकालानंतर भावामध्ये बराच फरक पडू शकतो, असेही सट्टेबाजांना वाटते.
सामन्याचा भाव :
*न्यूझीलंड : ५० पसे;
*इंग्लड : पावणेदोन रुपये