..अन् राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हाऊन निघाले अॅडलेड ओव्हल

एका बाजूला पाकिस्तानच्या विकेट्स पडत होत्या आणि स्टेडियमवर भारतीय क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष सुरू होता तर, दुसऱया बाजूला निसर्गाच्या नयनरम्य दृश्याने उपस्थित भारावले.

ind15एका बाजूला पाकिस्तानच्या विकेट्स पडत होत्या आणि स्टेडियमवर भारतीय क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष सुरू होता तर, दुसऱया बाजूला निसर्गाच्या नयनरम्य दृश्याने उपस्थित भारावले. अवघे अॅडलेड ओव्हल भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचा अनोखा क्षण क्रिकेट चाहत्यांना अनुभवता आला. सायंकाळी मावळत्या सूर्यामुळे नभाला आलेला केशरी रंग, अॅडलेड ओव्हल क्रिकेट मैदानाचे पांढरे शुभ्र छप्पर आणि हिरवेगार स्डेडियम अशाप्रकारे संपूर्ण स्टेडियम भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात नटलले पाहायला मिळाले. स्टेडियमवर उपस्थित भारतीय चाहत्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे दृश्य टीपले आणि त्वरित ट्विट देखील केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Adelaide ground looking like an indian flag