भारतीय क्रिकेट चाहत्यांनी न्यूझीलंडला पाठिंबा द्यावा- मॅक्क्युलम

क्रिकेटचा एक मोठा चाहता वर्ग असलेला देश म्हणजे भारत. याच क्रिकेट चाहत्यांच्या पाठिंब्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने पत्र लिहले आहे.

क्रिकेटचा एक मोठा चाहता वर्ग असलेला देश म्हणजे भारत. याच क्रिकेट चाहत्यांच्या पाठिंब्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने पत्र लिहले आहे.
न्यूझीलंडचा रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना होत आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर होत असलेल्या या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी न्यूझीलंडला पाठिंबा देण्याचे आवाहन मॅक्क्युलमने पत्राद्वारे केले आहे. तसेच,  भारतीय प्रेक्षक नक्की न्यूझीलंडला पाठिंबा देतील असा विश्वासही त्याने दर्शविला आहे. आमच्या कारकिर्दीतील हा खूप मोठा सामना असून, आम्हाला पाठिंब्याची गरज आहे, असेही त्याने  म्हटले. न्यूझीलंडचा संघ यापूर्वी कधीही विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे हा सामना त्यांच्या संघासाठी कारकिर्दीतील मोठा सामना ठरणार आहे.
letter

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Brendon mccullum writes letter to indian fans ahead of final against australia